गोरेपणा | Readers Choice | Kalnirnay Blog

काला है वो तेरा है – गोरावाला मेरा है |

 

सावळा वर बरा गौर वधूलाफार फार वर्षापासूनची म्हण आहे. म्हणजे उपवर मुलगी जशी सुंदर,खाशी सुबक, ठेंगणी तसा उपवर मुलगा. आपल्याकडेच नाही तर पाश्चात्य देशातही पुरुष Tall Dark, Handsome उंच सावळा आणि पर्यायाने देखणा… ‘गडी अंगानं उभा नि आडवा’ त्याच्या रूपाचा गावरान गोडवामाणूसच का, आपले देव पाहाम्हणजे देखणे गणले जाणारे देव, सावळा राम,निळा कृष्ण आणि ज्याची उपमा सुंदर जोडप्याला दिली जाते अशा लक्ष्मीनारायणाच्या जोडयातला नारायण श्री विष्णू, हिमगौर पर्वतीसुद्धा लुब्ध झाली सावळ्या शंकरावरमहाराष्ट्राचं आराध्य दैवत विठूराया काळभोर, खंडोबा पण सावळा

 

सौंदर्याचे जे मापदंड आपल्याकडे लावले जातात त्यात पुरुष गोरापान असं म्हटलं की, उगाचच हसायला येतं. गोरीपान बाईच किंवा मुलगी (हे मी पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार सांगतेयवाद नकोत) चित्पावनी घारे गोरेपणा वगळता आपल्या महाराष्ट्र देशी सावळे, काळे पुरुष अगदी छान खपायचेअगदी लाग्नातही नवरीचे फेशिअल,ब्लिच आदी सोळा शृंगार चालायचे,नवऱ्याला हळद लागली की झालं

 

मी हे भूतकाळात बोलतेय हे कळलं असेलच, कारण सध्या बायकांची एकाधिकारशाही,एकछत्री अंमल असलेल्या गोरेपणावर पुरूषांच जाहीर आक्रमण झालंयतेही खुल्लात्यांच्या मर्दपणाला आव्हान देतमर्द होकर लडकीयोकी क्रीमअसं उपहासानं म्हणत त्या बापड्याचं हतवीर्य केलं जातंय.सवय होती ती सावळी मुलगी ब्लिच क्रीम जे काही लेप असतील ते लावून आठ दिवसात ‘गोरी गोरी’ होऊन त्याच्या जोरावर नवरा ते नोकरी काहीही मिळवते हे जाहिरातीमधून पाहण्याची. तमाम बायाबापड्या,अक्का,मावश्या,ताईमाईवर हे ठामपणे बिंबवलं जात असताना मध्येच एखादा बाप्या आणि शाहरुख खान पुरुषांना गोरेपान व्हायच्या टिप्स देतो हे अति झालं

 

जाहिराती म्हटलं की, दोन घटक बाईआणि बाई म्हणजे मानेच्या वरची बाई वासुज्ञास अधिक सांगणे न लगेती बाई मग ती गाडी असो वा बिडीसूट असो की बूटटूथपेस्ट असो की टोयलेट क्लीनर मुख्य बाई ! वर उल्लेखिलेल्या उत्पादनापैकी काहीही वापरणाऱ्या बाप्याच्या जाळ्यात पडून फिदा होणारीअशी या क्षेत्रात पुरुषाला गोरं होणं अपरिहार्य करणारी ही लहरघोर कलयुग ! आपण पुरुष,बाप्या,मर्द आहोत म्हणजे स्वर्ग सात ओंजळ उरला असं वाटणाऱ्या आपल्या देशामध्ये असे काळे पणामुळे ढेपाळलेले पुरुष दिसणं आणि त्यांनी आपला कॉमप्लेक्स कबूल करणंअरे यार ही खरी क्रांती ही खरी सबलाआहात कुठे लेको ?

 

फुले,रॉय,आगरकरांच्या वरताण कार्य या नव्या ट्रेंडंन केलंयनाही म्हणायला एक उत्पादन होतंफक्त आणि फक्त पुरुषांसाठी,शारीरिक दौबल्याचंपण तेही बाईला डेस्परेट दाखवून तिच्यावर उपकार केल्याच्या थाटातअशा परिस्थितीत पुरुषांनी गोरपान होण्यासाठी वेडंपिसं होणंआणखी समता कायहवी हो ?

 

आता जाहिरातीतला काळा पुरुष गोरा झाला की नोकरीपासून छोकरी पटली आणि फक्त गोरेपणावरचीच क्रीम,लेप,उट्या एवढ्यावर नाही तर पुढचे षोडशोपचारही पुरुष करू लागलेत.मध्यंतरी मेट्रो सेक्शुअल नामक प्रकरण जोरात होतं.फेशिअल करणारा नटणारा पुरुष तेजीत होता.पण हळूहळू ते मागे गेलं. आणि पुन्हा आपले दाढीचे खुंट वाढलेले,काळे,राकट,रापलेले पुरुष दिसू लागले तेवढ्यात परत ही क्रांती…!

 

फक्त परफ्युमचा फवारा मारून भिकारी किंवा दात काढायला आलेला रुग्ण बाईला वश करतो, हे आपल्याला बघायची सवय. झोकात गाडी आणली, बाई पटलीच्युईंगम खाल्लं, पोरगी गटलीकोल्ड्रिंक प्यायलं,बनियन घातलं,बूट बदलले,दाढी केली,वेफर्स खाल्ले,कॉफी प्यायलीबाईला घायाळ करून वश करावयाचे इतके सोपे फंडे असताना ही अवदसा पुरुषवर्गाला का आठवावी ?

 

म्हणजे जाहिरात आणि मानसिकता यानुसार गोरा मुलगा/बाप्याकडे दुर्लक्ष करून काळयांच्या गळ्यात पडणारी बाई दिसणं हे सर्वसंमतइथे आपण काळे आहोत याची लाज वाटायला लावणारे पुरुष बघितले आणि परम संतोष जाहलाकारण सर्वगुणसंपन्नच असा पुरुष पहायची सवयस्त्रीमुक्तीवाल्यांचं,स्त्रीवाद्यांचा चुकतंयत्यांनी या जाहिरातींची तळी उचलायला हवीत्याचं किती काम हलक झालंय.

 

आणि काळया,सॉरी,सावळ्या बाप्यांचे धाबे दणाणलेजाहिरात पाहून वाटलेलं की छयाहे प्रॉडक्ट आपल्याकडे खपणं शक्यच नाही.पण या क्रीमना प्रचंड मागणी आहे हे सिद्ध झालंय.म्हणजे पुरुषांवर किती अन्याय होत होता इतकी वर्ष ? तोंड दाबून बुक्क्याचा मारवर बोलणार कसं ? बघा, मिळाला ना तोडगाकुठेतरी समता आलीभले वरवरची का होईना पण आलीइथली बायांची मक्तेदारी संपली,केस,दाढी फार तर नखं कापणं एवढ्यावर पुरुष सलूनमधून आता बाहेर पडत नाहीतते पण डे स्पाला जातात, आहात कोठे ? ‘कालाय: तस्मै नम: I’ व्हा बाबानो गोरंआम्ही म्हणू ‘गोरा गोरा पानदुधासारखा छान देवा मला एक नवरा / बॉयफ्रेंड आण…’

 

आता आपल्या निळ्यासावळ्या रामाचं कृष्णाचं काय ? ‘त्या सावळ्या तनूचे मज लागले पिसे गं…’ किंवा ‘मोरा गोरा अंग लै लेमोहे श्याम रंग दै दे…’ अस म्हणण्याची वेळच येणार नाही… ‘गोरा है और मेरा है…’ असं म्हणूया.

 

यापुढे जाऊन आता पुरुषांसाठी नेलपेन्टस, मस्कारा इत्यादी उत्पादनं आली तरी काहीही वाटणार नाहीएवढा चमत्कार झालायतुमची आमची बात सोडापाळण्यातल्या तान्हुल्याला लहानपणीच गोरापान करणारं बेबी क्रीम अवतरेलही लवकरआपण पाहायचं. या सगळ्या गोऱ्यांच्या गर्दीत आपला एखादा चिकणा असेलही. शेवटी बायकांना काय आवडत तेही पुरुष किंवा दुसरेच ठरवतात ना ? त्यामुळे Tall Dark, Handsome चा हट्ट सोडाआणि गोरा धरा… ‘जय हो…’

 

शुभा प्रभूसाटम

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.