गणपती १. अनंतचतुर्दशी : श्रीगणेशविसर्जन : ह्या दिवशी अनेक घरांमधील गणपतींचे तर चाळीस हजारांहून अधिक सार्वजनिक गणेशोत्सवांचे विसर्जन केले जाते. श्रीगणेशचतुर्थीच्या दुसऱ्या दिवसापासून गणपती ची सकाळ-संध्याकाळ दोन्ही वेळा पंचोपचारी पूजा केली जाते. अनंतचतुर्दशीलादेखील सकाळी अशी पंचोपचारी पूजा करावी. नंतर नैवेद्य दाखवावा. उत्तरपूजा करावी. गणपती च्या शेजारी ठेवलेल्या श्रीफळांना जागेवरून हलवावे. नंतर आपल्याला घरच्या अथवा मंडळाच्या […]