जानेवारी महिन्यात अगदी उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या मकर संक्रमणाशी जोडलेले हवामान, त्याच्याशी जोडलेली पीकपद्धती आणि त्याच्याशी जोडलेली आपली अर्थव्यवस्था या सगळ्यात संक्रांतीचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्या शेती व्यवसायातील उत्पादन दामदुपटीने वाढावे, अशी एक श्रद्धा यामागे आहे. भारतात आपल्याकडे ‘वर्षा’कालीन आणि ‘हेमंत’कालीन अशी वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. या हेमंतकालीन उत्पादनात तीळ हे एक […]
कालनिर्णय निवडक
आधुनिक जीवनातील गूढवाद
आजच्या जगाचा व्यवहार सुरू आहे, तो विवेकवाद, विज्ञान आणि भांडवलशाही या तीन घटकांवर आधारित. या तीन घटकांमुळे अभूतपूर्व अशी समृद्धी निर्माण करण्यास मदत झाली आहे. किंबहुना, मानवाच्या इतिहासात प्रथमच आपल्याला गरिबीचे पूर्णपणे उच्चाटन करण्याची संधी मिळाली आहे. दीडशे वर्षांपूर्वीच्या राजेरजवाड्यांनी जो ऐषोआराम भोगला नसेल, तो ऐषोआराम आणि ती जीवनशैली आजचा मध्यमवर्ग उपभोगत आहे. पण तरीही […]
पशूंचे शहाणपण
माणसानं शिकाव्यात अशा बऱ्याच गोष्टी पशूंच्या जवळ आहेत हे नीतिकथा, बोधकथा सांगणाऱ्या लेखकांनी पहिल्यांदा उलगडून दाखवलं आहे. शांतीपर्वातील कथा, पंचतंत्र, हितोपदेश या ग्रंथांतील कथा किंवा इसाप, लाफौन्ते यांनी लिहिलेल्या कथा पाहिल्या तर त्यातली पात्रं पशू आहेत, पक्षीही आहेत. माणसांऐवजी या लेखकांनी पशू का वापरले असावेत याचं उत्तर ठामपणे देता येत नाही, पण काही अंदाज करता […]
राहून गेलेल्या गोष्टी
माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं त्याला आपल्या हातून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या यापेक्षा कुठल्या राहून गेल्या याचीच अधिक चुटपूट लागून राहते. सर्वांच्याच बाबतीत असं असेल असं नाही मी म्हणत. पण आयुष्याची गाडी उताराला लागते, नवं वळण काय घ्यावं ते सर्वस्वी आपल्या हातात राहत नाही. आता कासरा आपल्या एकट्याच्याच हाती नाही हे ध्यानात […]
गंधर्वनाम संवत्सरे …
या नव्या वर्षाचं नाव पंचांगकर्त्यांच्या लेखी काहीही असलं तरीमराठी नाट्य आणि संगीतप्रेमी माणसाच्या हिशेबी हे बालगंधर्वनामे संवत्सरच आहे. बालगंधर्व नावाचा या महाराष्ट्राच्या नाट्यकला क्षेत्रात जो एक चमत्कार घडला, त्या विस्मयकारक नटवराच्या जन्मशताब्दीचं हे वर्ष आहे. जीवनाच्या निरनिराळ्या क्षेत्रांत उत्तम दर्जाचं कार्य करणाऱ्यांना श्रेष्ठत्व मिळतं, लोकप्रियता मिळतं. पण विभूतिमत्त्व लाभतंच असं नाही. ही कुणी कोणाला उचलून […]
नियतीलाही मदत लागते
काही काही माणसं जन्माला येतानाच ‘ सुखी माणसाचा ‘ वॉश अँड वेअर सदरा घालून येतात. ‘ वॉश अँड वेअर ‘ असं म्हणायचं, पण या थोर लोकांनाही गरज पडणार नाही असे यांचे योग. किंवा तशी गरज पडलीच तर लाँड्रीचे दुकान यांच्या इमारतीत तळमजल्यावर असतं. वरच्या मजल्यावरून नुसत्या टाळ्या वाजवल्या तरी या महाभागांना एकदम ‘ तव्यावरची पोळी […]
थोरली माउली
ज्ञानेश्र्वरीला माउली मानतो, तो मराठी माणूस. माउली का तर तिच्यात आईची माया आहे आणि तिची रचना आईने गायिलेल्या ओवीछंदात आहे म्हणून ज्ञानदेवांना आपल्या ओवीछंदाचे अप्रूप आहे. त्यांनी मोजून दहा वेळा या ओवीछंदाचा निर्देश केला आहे. त्यांतील एक ‘तैसी गाणीव तें मिरवी । गीतेंविण रंगु दावी । ते लोभाचां बंधु ओवी ।केली मियां ॥’असा आहे. ज्ञानदेव […]
मी – एक नापास आजोबा
” सध्या तुम्ही काय करता? ” या प्रश्नाचं ” दोन नातवांशी खेळत असतो ” याच्याइतकं सत्याच्या जवळ जाणारं दुसरं उत्तर माझ्यापाशी नाही. नातवंडांची तलफ कशी येते हे आजोबा- आजीच जाणतात. नातवंडं हे म्हातारपणात लागणारं जबरदस्त व्यसन आहे. गुडघ्यांच्या संधीवातावर अचपळ नातवामागून धावणं हा रामबाण उपाय आहे. आणि एरवी खांदेदुखीमुळे वर न जाणारे हात नातवंडांना उंच […]