नरक चतुर्दशी दिवशी काय करावे? भल्या पहाटे सूर्योद्यापूर्वी सर्वांनी तिळाचे तेल, सुगंधी उटणे लावून (अभ्यंग) स्नान करावे. नवीन वस्त्रालंकार धारण करावेत. स्नानोत्तर देवपूजा करुन मग सर्व कुटुंबीयांनी एकत्रितपणे खास दिवाळीसाठी बनविलेल्या लाडू, करंज्या आदी पदार्थांचा आस्वाद घ्यावा. नरकचतुर्दशीपासून चार दिवस (भाऊबीजेपर्यंत) रोज अभ्यंगस्नान करावे. घराच्या दारात रांगोळी काढून पणत्या लावाव्यात. खिडकीत कंदील लावावा. शक्य असल्यास […]
नरक चतुर्दशी
दिवाळीचे महत्त्व
आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचा अंधार मागे टाकून उच्चल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत. आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी […]