शारदीय नवरात्रीनिमित्त आपण सांप्रत प्रतिदिन देवीच्या विविध रूपांचे वेगवेगळ्या प्रकारांनी स्मरण करीत आहोत. आज नवरात्रीचा सहावा दिवस आहे. ही सहावी माळ देवीच्या चरणी वाहताना आपण तिच्या वज्रधारिणी अशा पराक्रमी रूपाचे ध्यान करून तिला वंदन करणार आहोत. नवरात्रीनिमित्त जे काव्य आपण विवेचनासाठी घेतले आहे, त्या काव्याच्या रचनाकर्त्याला ज्योतिषाचे काही ज्ञान असावे, असे आधी म्हटले होते, त्याची […]
