श्रावण मासातील शुक्लपक्षात येणाऱ्या शेवटच्या शुक्रवारी हे व्रत करतात. पूर्वी ज्यांनी हे व्रत केले असेल अशा व्यक्तीचे मार्गदर्शन घेऊन हे व्रत करावे. घराच्या ईशान्य दिशेला मंडप घालून तिथे चौरंगावर कलशस्थापना करावी. त्या कलशावर वरदलक्ष्मीचे आवाहन करावे. देवीची श्रीसूक्तयुक्त पूजा करावी. देवीला एकवीस अपपूंचा नैवेद्य दाखवून पूजेला आलेल्या सर्व स्त्रिया, ब्राह्मणांना वाण द्यावे. देवीची कथा ऐकावी, […]