गणपतीचे वाहन म्हणून उंदीर प्रसिद्ध आहे. खरे म्हणजे उंदराप्रमाणे मोर हेसुद्धा गणपतीचे वाहन आहे. पण गणपतीच्या मूर्तीपाशी जशी उंदराची लहानशी मूर्ती ठेवली जाते किंबहुना तशी ती ठेवली जाणे अत्यावश्यक मानले जाते तसे उंदराजवळ किंवा उंदराऐवजी मोर हवाच असा कोणी आग्रह धरीत नाही. मोर हे गणेशाचे वाहन आहे हे लक्षात घेऊन गणपतीला मोरेश्वर, मयुरेश्वर अशी […]
