माणसानं शिकाव्यात अशा बऱ्याच गोष्टी पशूंच्या जवळ आहेत हे नीतिकथा, बोधकथा सांगणाऱ्या लेखकांनी पहिल्यांदा उलगडून दाखवलं आहे. शांतीपर्वातील कथा, पंचतंत्र, हितोपदेश या ग्रंथांतील कथा किंवा इसाप, लाफौन्ते यांनी लिहिलेल्या कथा पाहिल्या तर त्यातली पात्रं पशू आहेत, पक्षीही आहेत. माणसांऐवजी या लेखकांनी पशू का वापरले असावेत याचं उत्तर ठामपणे देता येत नाही, पण काही अंदाज करता […]
