कोणतीही गोष्ट सहज मिळाली,की त्याची किंमत माणसाला कळत नाही आणि जेव्हा तीच गोष्ट मिळेनाशी होते, तेव्हा तिचे महत्त्व समजू लागते.झोपेच्या बाबतीतही तेच दिसून येते.मात्र झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे.आरोग्यसंपन्न जीवनाचे जे तीन आधार आयुर्वेदात सांगितले आहेत, त्यात झोपेचा समावेश आहे. यावरूनच झोपेचे महत्त्व लक्षात येऊ शकते.झोप म्हणजे आपल्या शरीराला पुन्हा पुन्हा प्राह्रश्वत होणारी […]
