ज्ञानेश्र्वरीला माउली मानतो, तो मराठी माणूस. माउली का तर तिच्यात आईची माया आहे आणि तिची रचना आईने गायिलेल्या ओवीछंदात आहे म्हणून ज्ञानदेवांना आपल्या ओवीछंदाचे अप्रूप आहे. त्यांनी मोजून दहा वेळा या ओवीछंदाचा निर्देश केला आहे. त्यांतील एक ‘तैसी गाणीव तें मिरवी । गीतेंविण रंगु दावी । ते लोभाचां बंधु ओवी ।केली मियां ॥’असा आहे. ज्ञानदेव […]