धनत्रयोदशी आज धनत्रयोदशी आहे. आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशी ज्या दिवशी प्रदोषकाल-व्यापिनी असेल त्या दिवसाला धर्मशास्त्राप्रमाणे ‘धनत्रयोदशी’ म्हटले जाते. धनत्रयोदशी या शब्दाचा अपभ्रंश ‘धनतेरस’ असा आहे. या दिवशी धनाची पूजा करण्याचा पूर्वापार परिपाठ आहे. याच दिवशी ‘यमदीपदान’ असाही एक शास्त्रार्थ दिलेला असतो’ यमाला या दिवशी दीपदान करावे, असे धर्मशास्त्राचे सांगणे असले तरी यमाला दीपदान कसे करणार […]
धनतेरस
दिवाळीचे महत्त्व
आपण तेजाचे उपासक आहोत. शतकानुशतके आपण प्रकाशमार्गावरचे पथिक आहोत. सर्व प्रकारचा अंधार मागे टाकून उच्चल प्रकाशाच्या दिशेने आपले प्रत्येक पाऊल पुढे पडावे, अशी मनोमन इच्छा बाळगणारे आपण फार मोठी परंपरा आणि मोलाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या भारत देशाचे नागरिक आहोत. आपली दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे, हा प्रकाशाचा उत्सव साजरा करताना आपण काळोख्या रात्रीला तेजोरत्नांच्या अलंकारांनी […]