असे सांगतात की, या सृष्टीच्या प्रारंभी एक शब्द निर्माण झाला तो शब्द म्हणजे उकाराचा ध्वनी होय, असे आपण समजतो जगातील इतर ठिकाणी लोक आपआपल्या मतानुसार हा ध्वनी कोणता असेल याचे विविध अंदाज पूर्वापार वर्तवीत आलेले आहेत. एखादा मोकळा शंख कानाला लावला की त्यामधून ॐकाराचा ध्वनी उमटलेला ऐकू येतो. शंखात पाणी किंवा दुसरे काही भरलेले असेल […]