वयाच्या ५६ व्या वर्षी निवृत्ती नियोजनाला सुरुवात करणे म्हणजे खूप उशिरा सुरुवात करण्यासारखे आहे. निवृत्ती नियोजनाला खरे म्हणजे वयाच्या ३० व्या वर्षीच सुरुवात करणे हितावह असते. निवृत्ती नियोजनाची गरज : (१) वाढलेले आयुर्मान : वैद्यकीय शास्त्रात झालेल्या प्रगतीमुळेतसेच बदललेल्या गुणवत्तापूर्ण राहणीमानामुळे सरासरी आयुष्यवाढते आहे. निवृत्तीनंतर आपल्याला २५ ते ३० वर्षे जगायचे आहे आणि तेही सन्मानाने ! […]