आपण या वर्षीच्या नवरात्रात ज्या काव्याच्या आधारे नवरात्र उत्सव साजरा करीत आहोत त्या काव्याच्या कर्त्याला ज्योतिषशास्त्राचे चांगले ज्ञान असावे, असे वाटते. कारण कुंडलीतील पंचमस्थान हे मुलांचे, संततीचे स्थान होय. पाचव्या दिवशी देवीचे स्मरण करताना कवीने तिच्या माता या स्वरूपावर अधिक भर दिला आहे आणि तो देताना तिचे आपल्या मुलांवर कसे प्रेम असते ते सांगितले आहे. […]
