साहित्य : बटाटे, हिरव्या मिरच्या वाटलेल्या, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, तळण्यासाठी तेल, खाण्याचा पिवळा रंग. कृती : बटाटे स्वच्छ धुवून घ्या. कुकरमध्ये वाफवून गार करा. पुरणयंत्रातून वाटून घ्या. चवीनुसार हिरव्या मिरच्या वाटलेल्या, मिठ, जिरेपूड, राजगिऱ्याचे पीठ, खाण्याचा पिवळा रंग मिसळा, खूप मळा. शेवपात्रातून शेव पाडा. तळा. टिप : ही शेव फारच कुरकुरीत व चवदार होते.
