भाऊबीज

भाऊबीजेच्या दिवशी यमराज आपल्या बहिणीकडे म्हणजे यमीकडे जेवावयास गेले. यमीने त्याचे योग्यप्रकारे आदरातिथ्य केले. त्याला ओवाळले. त्या दिवसाची आठवण म्हणून ह्या दिवशी भावाने आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिथेच जेवावे अशी प्रथा आहे. ह्यावेळी बहिणीने भावाला ओवाळावे. भावाने ऐपतीप्रमाणे तिला ओवाळणी घालावी. बहिणीनेही भावाला एखादी भेटवस्तू द्यावी, जेवणात भावाच्या आवडीचे पदार्थ करावेत. सख्खी बहीण नसलेल्यांनी चुलत, […]