१५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. स्वातंत्र्यापूर्व काळात असलेली भारत-देशाची प्रांतरचना ही निश्चित योजना आखून केलेली नव्हती. भाषावर प्रांतरचनेचा आग्रह स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालू होता. स्वातंत्र्याच्या प्राप्तीनंतर दहा-बारा वर्षांनी जी भाषावार प्रांतरचना झाली, त्यात महाराष्ट्र आणि गुजरात अशा दोन राज्यांचे व्दिभाषिक राज्य झाले. पुढे त्या व्दिभाषिक राज्याला सगळीकडून विरोध झाल्यानंतर महाराष्ट्र आणि गुजरात […]