नाशिकची प्राचीन चांभारलेणी नाशिक शहरापासून अवघ्या आठ कि. मी. अंतरावर असलेल्या म्हसरूळ गावाजवळच्या डोंगरात चांभारलेणी कोरण्यात आली आहे. ही लेणी जैन पंथीयांची असून इसवी सन ११व्या शतकात तिचे निर्माण झाले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. चांभारलेणी समुद्रसपाटीपासून १४० मीटर उंचीवर आहे. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट चढून गेल्यावर तेथे पोहोचता येते. लेण्यांच्या अलीकडे दगडात कोरलेली दोन […]
मराठी लेखणी
बैलपोळा – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर(धर्मबोध)
पोळा(बैलपोळा) शेतीची नांगरणीची कामे करून थकलेल्या बैलांना एक दिवस आराम मिळावा, त्यांच्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करता यावी म्हणून प्रांतोप्रांती वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या महिन्यात ‘पोळा’ हा सण साजरा केला जातो. ह्याला काही ठिकाणी ‘बैलपोळा’देखील म्हणतात. पोळा ह्या दिवशी बैलांना प्रेमपूर्वक तेल लावून स्नान घातले जाते. त्यांची शिंगे रंगविली जातात. त्या शिंगांना नवे लोकरीचे गोंडे, वेगवेगळ्या मण्यांच्या […]
अहिल्याबाई होळकर
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी माणकोजी शिंद्यांची मुलगी आणि मल्हारराव होळकर ह्यांची लाडकी सून एवढीच अहिल्याबाईंची ओळख नाही. धर्मासाठी जे जे करता येईल, प्रजेच्या कल्याणासाठी जे जे करता येईल ते सारे अहिल्याबाईंनी मनापासून केले. संपूर्ण भारतात असे एक तीर्थक्षेत्र नाही जिथे अहिल्याबाईंनी काही ना काही तरी लोककल्याणार्थ योगदान दिलेले नाही! मग तो नदीतटीचा घाट असो […]
श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)
श्रावण कृष्ण नवमी : दहिकाला (दहीहंडी) : मथुरा, वृंदावन, गोकुळात ज्याप्रमाणे गोकुळाष्टमी आणि नंदोत्सव साजरा होतो, तसाच कृष्णजन्माच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्रात ‘दहिकाला’ साजरा करतात. विशेषतः कोकणात हा उत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. गोपसवंगड्यांसह गायींना घेऊन बालकृष्ण रानावनात जात असे. त्यावेळी त्या सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून त्या कालविल्या जात. (त्याला ‘कला’ म्हणतात.) कृष्ण ला दही-दूध […]
श्रीकृष्णजयंती – ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगांवकर (धर्मबोध)
श्रीकृष्ण जयंती श्रावण कृष्ण अष्टमी : १. श्रीकृष्णजयंती व्रत (कृष्णजन्माष्टमी) : श्रावणाच्या कृष्णपक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्र असताना बुधवारी मध्यरात्रौ ठीक बारा वाजता भगवान श्रीकृष्णांचा वसुदेव-देवकीच्या पोटी जन्म झाला. त्यानिमित्ताने दरवर्षी श्रावण कृष्ण अष्टमीला सर्व वयोगटातील भक्तमंडळी एकत्र येऊन हा कृष्णजन्मोत्सव अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. ह्या निमित्ताने ‘व्रत’ म्हणूनही ह्या जन्मोत्सवाकडे बघितले जाते. व्रतकर्त्या […]
परसबाग फुलविताना – डॉ. राजेंद्र देशमुख (उद्यानतज्ज्ञ)
परसबाग फुलविताना कडाक्याचे ऊन आणि सिमेंट- काँक्रीटची जंगले, प्रत्येकाला पावसाची प्रतीक्षा, कारण पाऊस, हिरवळ सर्वांनाच हवी आहेत. आज मोठ्या शहरांमध्ये जनसंख्या वाढल्यामुळे घरांची तसेच वाहनांची संख्यासुद्धा वाढतच आहे आणि त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. वृक्षतोड, जंगलांचे क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. तापमानवाढ, अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ हे आपण रोजच अनुभवतो, कारण जागतिक तापमानवाढ. मानो […]
छंदोपनिषद् | गौरी डांगे
‘मला कंटाळा आलाय…’, हे विधान अनेक लहान मुले, पौगंडावस्थेतील मुले आणि आपल्या आयुष्यात व्यग्र असलेल्या कितीतरी व्यक्तींच्या तोंडून सातत्याने ऐकू येते. अगदी वृद्ध किंवा निवृत्त व्यक्तींच्या तोंडीही हे वाक्य अनेकदा असते. या अस्वस्थ करणाऱ्या कंटाळ्यापासून सुरुवात झालेल्या काही व्यक्तींना औदासीन्य येते, कोणतीही गोष्ट बरोबर नाही असे वाटू लागते, आपल्या जगण्याचा उद्देश समजत नाही आणि काही वेळा […]
हाडांचे विकार – डॉ.ए.के.सिंघवी
हाडांचे विकार बदलती जीवनशैली आणि शहरीकरणामुळे स्नायू व हाडांच्या(हाडांचे विकार) व्याधींचे प्रमाण सध्या वाढलेले पाहायला मिळते. अलीकडील काळात आयुर्मान वाढले आहे, पण या वाढत्या वयानुसार अनेक वृद्धांना ऑस्टीओपोरोसिस, फ़्रॅक्चर, सांधेदुखी अशा हाडांच्या विकारांना तोंड द्यावे लागत आहे. ऑस्टिओआर्थ्रायटिस नितंबांच्या आणि गुडघ्याच्या सांध्यांना होणारा ऑस्टिओआर्थ्रायटिस हा आजार जगभरातील वृद्धांच्या हालचालींवर बंधने येण्याचे प्रमुख कारण ठरत आहे. […]
गृहोद्योगाचा सूर्योदय: डॉ. मेधा पुरव-सामंत
१. गृहोद्योग साठी भांडवल कसे उभारावे? पुण्या–मुंबईबरोबरच इतर लहान– मोठ्या शहरांतूनही मायक्रो फायनान्स करणाऱ्या कंपन्या, नॉन बँकिंग कोप्रतीओन, तसेच ना नफा–ना तोटा तत्वावर चालणार्या संस्था कार्यरत आहेत, ज्या अगदी गरीब महिलांनादेखील उद्योगधंद्यासाठी भांडवल पुरवतात. गरीब स्त्रियांहून थोडा वरचा वर्ग म्हणजे ज्यांच्याकडे तारण, जामीन आहे. अशा स्त्रियांसाठी बरेच पर्याय आहेत. बऱ्याचशा सहकारी बँकां अशा महिलांना कर्ज देतात. […]
बाहेरगावी जाताना झाडांची निगा
प्रत्येकास आपली स्वतःची अशी बाग असावी अशी इच्छा असते. फळझाडे नसली तरी किमान फुलझाडे तरी असावी अशी इच्छा असते. ही हौस घरातील गॅलरीत कुंड्यांमध्ये फुलझाडे लावून पूर्ण केली जाते. पूर्वी चाळीमध्ये घराबाहेर कुंड्यांमध्ये जास्वंद, झेंडू, मोगरा, शेवंती, गुलाब, गुलबक्षी, रातराणी, तुळस, कोरफड, सदाफुली यासारखी अनेक झाडे लावली जात असत. घरातील कुंड्यांमध्ये फुललेली जास्वंद देवाला वाहताना, […]