१९४८ मध्ये ३० जानेवारी रोजी म्हणजे आजच्याच दिवशी महात्मा गांधी या जगातून गेले. गांधीजी देहरुपाने गेले असले तरी मरावे परी कीर्तिरुपे उरावे या समर्थांच्या वचनाप्रमाणे ते उरलेले आहेतच. जगभरचे विचारवंत आजही गांधीजींच्या विचारांची मुक्त कंठाने स्तुती करीत असतात. नेल्सन मंडेलांसारखा जगन्मान्य नेता आपल्या अलौकिक यशाचे श्रेय गांधीजींच्या तत्त्वज्ञानाला देतो. त्यांच्या निधनाला चार दशके लोटल्यावरही त्यांच्यावरचा […]