समाजाचा ऐहिक विकास हा नैसर्गिक परिस्थितीची अनुकूलता,सामाजिक व्यवहारांची सुदृढ बांधणी, समाजाच्या हाती असलेले तंत्र-विज्ञान आणि आर्थिक शक्ती या चार घटकांच्या परस्पर पूरक अशा एकत्रित बांधणीवर अवलंबून असतो. या प्रत्येक घटकाची स्थनिक वैशिष्टे नीट माहिती असणे, त्यांच्या मर्यादा लक्षात येणे, त्यांच्यात कोठे, किती व कशी भरघालता येईल याबद्दलचा सामाजिक टक्का विवेक असणे यावर प्रगतीची दिशा ठरते. […]
