लक्ष्मीपूजन कसे करावे? दीपावलीच्या ह्या दुसऱ्या दिवशीदेखील पहाटे लवकर उठून तेल-उटण्याने अभ्यंगस्नान करण्याची प्रथा आहे. सकाळी देवपूजा, दुपारी पितरांचे श्राद्धविधी करुन प्रदोषकाळी पुन्हा स्नान करुन शुचिर्भूत व्हावे. नंतर पूजायोग्यस्थळी चौरंगावर अथवा पाटावर कुंकुम अक्षतांच्या साहाय्याने आठ पाकळ्यांचे कमळ काढून त्यावर लक्ष्मी, विष्णू, कुबेर ह्यांची पूजा करावी. त्या तिघांचीही मनोमन सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करावी. नंतर त्यांना लवंग, वेलची, […]
