श्रावणातील दुसऱ्या सोमवारी हिमाचल प्रदेशातील चंबा प्रांतात एक जत्रा भरते. ती पुढे बरेच दिवस चालू असते. ह्यावेळी गोडधोड खाण्याचे. जेवणाचे आणि गाण्यांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. शेवटच्या दिवशी सगळी मंडळी मिरवणूक काढून नदीवर जाऊन मंत्रोच्चारांसह वरूण देवतेसाठी त्या नदीच्या पात्रात वाहत्या प्रवाहामध्ये मक्याच्या कणसाचे केस आणि नारळ सोडतात. मग सर्वजण परस्परांना अत्तर लावून मिठाई वाटतात. […]
