समर्थांनी प्रभुरामचंद्र आणि महाबली हनुमान यांचा आदर्श लोकांसमोर ठेवला त्याच्यी सर्व कारणे आपल्याला या घडीला समजू शकली नाहीत. या काळात राम आणि हनुमंताचा आदर्श हा आवश्यक होता एवढे आपण ठामपणे म्हणू शकतो,कारण रामाने देवांना रावणाच्या कैदेतून मुक्त केले. कर्तव्यपालनासाठी सर्व प्रकारच्या ऐहिक सुखांकडे पाठ फिरवून हा मर्यादापुरुषोत्तम विविध प्रकारचे कष्ट आनंदाने सोसत राहिला. समर्थांच्या काळात विलासी […]