बोनसचे दिवस आले होते. आम्ही दोघं नवराबायको त्या रकमेत घरात काय-काय, किती-किती करता येईल ह्याचे हिशेब मांडीत-मोडीत होतो. तेवढयात एक नेहमीचे गृहस्थ आले. आमच्यातला सारा प्रकार ते अवाक होऊन पाहात होते. ह्यांना एवढं कसलं आश्र्चर्य वाटतंय ॽ माझ्या मनात आलं. मी विचारलही. ते म्हणाले, हा माणूस-म्हणजे तुमचा नवरा व्यवहारात गाढवच दिसतो. बोनस किती आला-येणार तुम्हाला […]
