बलभीम मारुतीचे वैशिष्ट्य काय? एक महत्त्वाची गोष्ट अशी की, मारुती कधीही पराभूत झालेला नाही. अवघड प्रसंगी त्याला आपल्या अंगच्या अद्भुत शक्तीची जाणीव होते आणि तो कोणत्याही बिकट प्रसंगातून सहजपणे मार्ग काढतो. मध्वमुनीश्र्वरांनी मारुतीरायाच्या पराक्रमाचे वर्णन करणारे एक सुंदर पद लिहिले आहे. मध्वमुनीश्र्वरांच्या इतर रचनांप्रमाणेच हे पद्सुद्धा प्रासादिक आणि मधुर असे आहे. विजयी माझा श्रीहनुमान। अंजनीनंदन […]
हनुमान
एकनिष्ठ बलवंत मारुती
चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी झाली की, चैत्र पौर्णिमेला रामाच्या परमभक्ताची म्हणजेच श्रीहनुमानाची जन्मतिथी येते. राजा दशरथाने केलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञानंतर प्रत्यक्ष अग्निदेवाने दशरथाच्या पदरात जे पायसदान टाकले त्याचा काही अंश एका घारीने पळविला. तो हनुमानाची माता अंजनी हिच्या ओंजळीत पडला. तो तिने प्राशन केला आणि त्यायोगे मारुतिरायाचा जन्म झाला. प्रभू रामचंद्राचे आणि हनुमानाचे नाते असे त्यांच्या […]