मारोतरावचा ७/१२ मारोतराव सिद्रप्पा लिंबाळे… मामलेदार कचेरीजवळच्या झाडाखाली रेणूका टी स्टॉलपाशी उभा होता. चहा ग्लासात भरून देत चहावाल्याने विचारलं, काय काम काढलं? मारोतराव चहाचा घोट घेत म्हणाला, ‘‘७/१२!’’चहावाला ‘बरं’ अर्थाने मान हलवत, थोडं बाजूला जात तोंड मोकळं करून पुन्हा आपल्या यांत्रिक हालचालीत सामील होत म्हणाला, ‘‘भाऊसाहेब उगवतातच बारा वाजता! आत्ताशी साडेदहा होतायत.’’ अशी वास्तवाची जाणीव […]
