पाणी आणि संस्कृतिबंध जानेवारी महिन्यात अगदी उत्साहात मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. या मकर संक्रमणाशी जोडलेले हवामान, त्याच्याशी जोडलेली पीकपद्धती आणि त्याच्याशी जोडलेली आपली अर्थव्यवस्था या सगळ्यात संक्रांतीचा दिवस महत्त्वाचा आहे. आपल्या शेती व्यवसायातील उत्पादन दामदुपटीने वाढावे, अशी एक श्रद्धा यामागे आहे. भारतात आपल्याकडे ‘वर्षा’ कालीन आणि ‘हेमंत’ कालीन अशी वेगवेगळी उत्पादने घेतली जातात. […]
Akshay Tritiya
अक्षय्य तृतीया व अक्षय्य दान
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त! कारागीर या दिवशी शेतीच्या कामाची हत्यारे करावयाला प्रारंभ करतात. शेतकरी वर्ग या दिवसाला विशेष महत्त्व देतो. चातुर्मासासाठी लागणाऱ्या भाजीचे बी खेड्यापाड्यातील स्त्रिया या दिवसात परसातील वाफ्यात पेरतात. हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. ब्राह्मणाला या […]