रात्रीचे साडेनऊ वाजले होते. शुभांगीने घरात पाऊल ठेवले आणि बाबा कडाडले(राग आला), “किती वाजलेत? वेळेच काही भान आहे की नाही? कुठे गेली होतीस भटकायला? काहीच शिस्त राहिलेली नाहीये, कॉलेजला जायला लागल्यापासून. आम्हीही अभ्यास केले, पण अशी थेरं नाही केली कधी…” शुभांगीने बोलायचा प्रयत्न केला, “बाबा, अहो ऐकून तर घ्या…” पण छे. बाबांचे सुरूच राहिले, […]