आवळ्याचे(आवळा) माहात्म्य आवळा दिसायला एवढासा, चवीला आंबट-तुरट पण आश्चर्यकारक अशी पोषणमूल्ये त्यात आहेत. आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग केला जातो. त्याच्यातल्या औषधी गुणांमुळे त्याला ‘सुपरफ्रूट’ असे म्हटले जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी घेण्यात येणाऱ्या च्यवनप्राशमध्ये मुख्यत्वे करून आवळ्याचा गर वापरला जातो. त्रिफळा चूर्ण या आयुर्वेदिक औषधात सावलीत वाळवलेला ताजा आवळा म्हणजे आवळकाठी असते. आवळा […]