सर्वच समाजामध्ये ‘अन्न’ शब्द उच्चारला तर काही ठराविक पदार्थांचेच चित्र स्वभावत: तरळते. युरोपियनांसमोर ‘गव्हाचा पाव’ येईल, अरबांसमोर ‘खुबुस’ तरळेल; बंगाली, बिहारी, दक्षिणी लोकांना ‘भाताचा शीग आणि रसम’चा दरवळ आठवेल; तशी मऱ्हाटी संस्कृतीत ‘भाकर’. अन्न म्हणजे भाकर! ही भाकरी मराठी भाषेत फार खोल रुतली आहे. ‘ज्याची भाकरी त्याची चाकरी’पासून ‘भाकरीला महाग’पर्यंत. बहिणाबाईंनी तर ‘आधी हाताला […]