“गेली ३० वर्षे मी सवयीचा गुलाम होतो! महिन्याच्या सुरुवातीला आणायच्या वाणसामानाच्या यादीबरोबर मी माझा महिन्याला लागणारा ‘जीवन छाप’ विड्यांचा स्टॉक आणत असे. सिगारेटच्या पाकिटावरचे वैधानिक इशारे टाळायला मी हा पर्याय निवडला आणि सिगारेट सोडून विड्या ओढायला लागलो. खर्चही थोडा कमी झाला, पण आज मात्र दोन जिने चढून येतानाही दम लागतो. डॉक्टर फार उशीर झाला का?” […]
