नाशिकची प्राचीन चांभारलेणी नाशिक शहरापासून अवघ्या आठ कि. मी. अंतरावर असलेल्या म्हसरूळ गावाजवळच्या डोंगरात चांभारलेणी कोरण्यात आली आहे. ही लेणी जैन पंथीयांची असून इसवी सन ११व्या शतकात तिचे निर्माण झाले असावे असा संशोधकांचा अंदाज आहे. चांभारलेणी समुद्रसपाटीपासून १४० मीटर उंचीवर आहे. लेण्यांकडे जाण्यासाठी पायऱ्यांची वाट चढून गेल्यावर तेथे पोहोचता येते. लेण्यांच्या अलीकडे दगडात कोरलेली दोन […]
