डाळींमधील रत्न चणाडाळी आपल्या खाद्यसंस्कृतीत चण्याच्या डाळीलाहीअनन्यसाधारण महत्त्व आहे. पण ती तुरीच्या डाळीइतकी लवकर शिजत नसल्याने रोजच्या वरणभातासाठी तूरडाळ तर वेगवेगळ्या सणांच्या आणि धार्मिक कार्याच्या वेळी चणे किंवा चण्याची डाळ अशी योजना आपल्या आहारसंस्कृतीत केली असावी. बाळाच्या बारशाला हरभऱ्याची उसळ म्हणजे घुगऱ्या हा पदार्थ आवश्यक असतो.चैत्रगौरीच्या हळदीकुंकवाला घरी आलेल्या स्त्रियांना भिजवलेले हरभरे ओटीमध्ये दिले जातात. […]