शिवरायांचे बालपण जग गाजविणाऱ्या व्यक्तींचे बालपण कसे होते, या विषयी प्रत्येकालाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाविषयी आपल्यालाही अशीच उत्सुकता नेहमीच असते. याबाबतीत आपण भाग्यवान आहोत. ऐन शिवकालात भोसले राजघराण्याच्या खूपच जवळच्या संबंधातील एका सुविद्य व्यक्तीने शिवाजी महाराजांचे चरित्रच लिहून ठेवले आहे. या व्यक्तीचे नाव परमानंद गोविंद नेवासकर. त्याने लिहिलेल्या चरित्रग्रंथाचे नाव आहे […]