नावडती बहुगुणी शेपू मुळात अनेकांना पालेभाज्या आवडत नाहीत. नाव जरी काढले तरी अनेक जण तोंड वेंगाडतात. पण त्यांना हे माहीत नसते, की शेपू ही भरपूर पोषणमूल्यांनी युक्त अशी बहुगुणी पालेभाजी आहे. शेपूची भाजी ‘क’ आणि ‘अ’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच लोह यांनी परिपूर्ण आहे. काही प्रमाणात ‘ब’ जीवनसत्त्वही तिच्यामध्ये असते. यातील ‘क’ जीवनसत्त्वामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, तर ‘अ’ जीवनसत्त्वामुळे डोळ्यांचे […]