विजयादशमी

आश्र्विनाच्या शुक्ल पक्षातील ही दशमी श्रवण नक्षत्राच्या योगावर ‘विजयादशमी’ होते. ही विजयादशमी श्रवण नक्षत्रयुक्त आणि सूर्योद्यव्यापिनी असल्यास सर्वोत्तम मानली जाते. ह्या दशमीलाच आपण ‘दसरा’ म्हणतो. दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. ह्या दिवशी कुठल्याही कार्यासाठी वेगळा मुहूर्त बघावा लागत नाही. (तरीदेखील अपराण्हकाळी म्हणजे दुपारी एक ‘विजयमुहूर्त’ असतो.) दसऱ्याला शेतीतील पहिले पीक वाजतगाजत घरी आणून आनंदोत्सव […]