सखा कृष्ण हरि हा ‘कृष्ण’ ह्या दोन अक्षरांमध्ये सर्वांची मने खेचून घेण्याची प्रचंड ताकद आहे. कोणी त्याच्या रूपाकडे आकृष्ट होतात, तर कोणी त्याच्या बाललीलांनी मोहित होतात. कोणी त्याच्या रासक्रीडेत रंगून जातात, तर कोणी त्याच्या योगीश्वर रूपासमोर नतमस्तक होतात. कोणी त्याच्या नीरक्षीरविवेकाने अचंबित होतात, तर कोणी त्याच्या गीतारूपी विवेक चिंतामणीचे तेज पाहून विस्मित होतात. अर्जुनाच्याच नव्हे, तर साऱ्या मानवजातीच्या […]
