पंचरत्न थालीपीठ थालीपिठामध्ये प्रथिने आणि सूक्ष्म पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. म्हणूनच या पदार्थाला पूर्णान्न म्हणतात. थालीपीठ हा अत्यंत लोकप्रिय असा महाराष्ट्रीय खाद्यपदार्थ आहे. रोजच्या आहारात तसेच उपवासाच्या पदार्थांमध्ये त्याला स्थान प्राप्त झाले आहे. उपवासाच्या थालीपिठाच्या पिठामधील जिन्नस थोडे वेगळे असतात. थालीपीठ हे मुख्य जेवण म्हणूनही चालते आणि अल्पोपहारासाठीही. साहित्य : १ कप ज्वारीचे पीठ, १ कप गव्हाचे पीठ, […]