माझी हळवी गुंतवणूक(इन्व्हेस्ट) गुंतवणुकीबाबत माझा नेहमीच गोंधळ होतो. मध्यम काय आणि उच्च काय, माणूस गुंतवणुकीबाबत फार हळवा असतो. मी कविता वगैरे लहानपणापासूनच करायचो. आता कविता वगैरे करणारा माणूस गुंतण्याच्या बाबतीत थोडा जास्तच संवेदनशील असतो. माझ्या कवितांचे पहिले वाचक आमचे मराठीचे सर असायचे. माझ्या कवितांमधून अचानक निसर्ग नाहीसा झाला तेव्हा ते काळजीत पडले आणि पुढच्या काही कविता वाचून अधिकच काळजीत […]