बोलावे आणि बोलू द्यावे! बोलणारा प्राणी’ ही माणसाची मला सर्वांत आवडणारी व्याख्या आहे. आपला मनातला राग, लोभ, आशा, आकांक्षा, जगताना येणारे सुखदु:खाचे अनुभव, हे सारे बोलून दाखविल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. साऱ्या कलांचा उगम त्याच्या या आपल्या मनाला स्पर्श करून गेलेल्या गोष्टी दुसऱ्याला सांगितल्याशिवाय न राहण्याच्या मूळ प्रवृत्तीत आहे. दुर्दैवानं तो मुका असला तर खुणांनी […]