१) अंगत पंगत मराठी पाक संस्कृतीचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की आपल्या खाद्य संस्कृतीविषयी आपल्यालाच पुरेशी माहिती नाही. घरातल्या काकू-मावशी-आजींशी बोलून देखील केवळ आपल्या खाद्य संस्कृतीमधील विशेष अशा मोजक्या पाककृती किंवा पद्धती कळतात. परंतु महाराष्ट्राच्या वैविध्यपूर्ण संस्कृतीमध्ये किती तरी आगळ्या वेगळ्या भाज्या उगतात, ऐतिहासिक, भौगोलिक प्रभाव आहेत, किती तरी जुन्या स्वयंपाकाच्या पद्धती, गोष्टी, वाक्प्रचार,भांडी देखील आहेत, […]
