आपण मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर फिरायला जातो तेव्हा नेहमीच तिथे कचऱ्याचे ढिगारे पाहावयास मिळतात. सण-उत्सवाच्या पवित्र काळात तर या ढिगाऱ्यांमध्ये शतपटींनी वाढ झालेली दिसते. आपण निसर्गाच्या या सुंदर घटकाचा होत असलेला ऱ्हास पाहून मनात हळहळतो आणि पुढे निघून जातो. परंतु गेले एक वर्ष दादर येथील जय श्रृंगारपुरे हा एक तरुण या घाणीच्या साम्राज्यात पाय रोवून उभा […]
