तुझ्या ‘गळ्या’, माझ्या ‘गळ्या’ जग बदलते, तशा आपल्या सवयी-सुद्धा बदलतात. त्याचबरोबर इतरांना सळो की पळो करून सोडण्याचे मार्गही! काळाच्या ओघात आल्यागेल्याचा छळ करण्याचे काही नवे फंडेसुद्धा तयार झाले. त्यातलाच एक म्हणजे ‘कराओके’. संगीतकारांनी, वादकांनी मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या गाण्यामधून गायकाचा गोड आवाज पुसून टाकायचा आणि तिथे आपला भसाडा, भेसूर आणि बेसूर आवाज भरायचा याला कराओके […]
