भांड्यांच्या दुनियेत भांडी’ हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य अंग आहे. माणसांच्या गरजेनुसार या भांड्यांमध्ये विविधता येत गेली. प्राचीन काळी भाजलेली मातीची भांडी वापरली जात. हळूहळू त्यांची जागा तांबा, पितळ, बिड, लोखंड या धातूंपासून बनवलेल्या भांड्यांनी घेतली. कालांतराने या धातूच्या भांड्यांची निगा राखणे कटकटीचे ठरू लागल्याने हळूहळू ही भांडी अडगळीत गेली आणि त्यांची जागा स्टील, प्लास्टिक आणि […]