आज महाशिवरात्री. रात्रीचे समान पंधरा भाग केल्यानंतर त्यांपैकी आठवा भाग तो निशीथकाळ होय. जेव्हा निशीथकाळी कृष्ण चतुर्दशी म्हणजे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्याची चौदावी तिथी असेल तिला शिवरात्री असे म्हणतात. माघ महिन्यात या शिवरात्रीस विशेष महत्त्व असल्याने तिला महाशिवरात्री असे म्हणतात. ही महाशिवरात्री म्हणजे महादेव शिवशंकराच्या भक्तांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचा मानला गेलेला दिवस होय. आपल्याकडे शिवपूजन आसेतुहिमाचल […]
