पूर्वीच्या काळी आतेभाऊ आणि मामेबहीण हे हक्काचे जोडीदार समजले जायचे‧ शिवाय, आप्तस्वकीय पंचक्रोशीतील स्थळ सुचवायचे कालपरत्वे जोडीदार निवडीचे पर्याय पंचक्रोशी ओलांडून दूरदूरपर्यंत पसरू लागले‧ वधू-वर सूचक मासिके, वृत्तपत्रांमधील छोट्या जाहिराती आणि गावोगावी उघडलेली वधू-वर मंडळे दूरदेशींच्या जोडीदारांची स्वप्ने दाखवू लागली‧ शहरांमध्ये जातीनिहाय ‘वधू-वर मेळावे’ भरू लागले‧ तंत्रज्ञानाने झेप घेतली, तशी जोडीदार निवडीच्या पर्यायांनीसुद्धा गगनभरारी […]