आठवणीतली लग्नपंगत माझ्या आठवणीतली पहिली ‘लग्नपंगत’ म्हणजे कोल्हापूरजवळच्या पट्टण कोडोलीतली. त्या वेळी तिथे बिरोबाची जत्रा होती. आम्ही ज्यांच्या घरी गेलो होतो, त्या घरी भावकीतले पाहुणे आले होते. कमलआक्का चहा घेऊन पडवीत आली आणि कोणाच्याही ध्यानीमनी नसताना तिचे लग्न त्या बसल्या बैठकीला ठरले. नवरामुलगा मिलिट्रीतला, त्याला सुट्टी नसल्याने त्याच दिवशी संध्याकाळी लग्न लावायचे ठरले. भराभर गल्लीतल्या […]
