मेथी दाण्यांचे महत्त्व मेथीच्या बिया सुंदर सोनेरी रंगाच्या असतात, त्यांनाच आपण मेथीचे दाणे असेही म्हणतो. मेथीच्या भाजीप्रमाणे या बियांमध्येही भरपूर पोषणमूल्ये असतात. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, मॅग्नेशियम, मँगेनीज, लोह, ‘अ’ आणि ‘क’ ही जीवनसत्त्वे तसेच ‘ब’ जीवनसत्त्वाचे अनेक प्रकार यांनी मेथीदाणे युक्त असतात. आयुर्वेदाच्या मते, मेथीचे पाणी यकृत, चयापचय क्रिया आणि मूत्रपिंड यासाठी उत्तम असते. वजन कमी करण्यासाठीही ते […]