देवाची करणी नि नारळात पाणी प्रत्येक कार्यात श्रीफळ म्हणून मिरवणाऱ्या नारळाला भारतीय खाद्यसंस्कृतीतही मानाचे स्थान आहे.आपल्या जेवणाचा गोडवा आणि स्वाद वाढवण्याबरोबरच नारळ आरोग्यवर्धकसुद्धा आहे.दररोजच्या स्वयंपाकात खोबऱ्याचा सर्रास उपयोग केला जातो.जसे की, चटणी, कोशिंबीर, सॅलेड, भाजी, आमटी वगैरे.खोबऱ्याच्या मिठाया, पक्वान्नांना तर लहानमोठ्या सर्वांचीच पसंती लाभते.श्रावणात केली जाणारी पानगी, नारळी पौर्णिमा-रक्षाबंधनसाठी खास नारळीभात, खोबऱ्याच्या करंज्या, गणपतीसाठी उकडीच्या […]