एक घास काऊचा एक घास चिऊचा लहान मुलांना खाऊपिऊ घालायचे म्हणजे आई–आजीची परीक्षाच असते.चिऊकाऊच्या गोष्टी सांगत बच्चे कंपनीला खायला घालताना घरातल्या सगळ्यांचीच तारेवरची कसरत होत असते.ही कसरत मुलांसाठी आरोग्यदायी आणि हितकारक व्हावी यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात.मुलांना खाण्याच्या चांगल्या सवयी लावण्याची सुरुवात वयाच्या सहाव्या महिन्यापासून होते.त्यामुळे चांगल्या सवयी लावण्याच्या दृष्टीने पहिल्या काही दिवसातच मुलांच्या भरविण्याकडे […]